आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटाकळीमिया यात्रेमध्ये खेळणी विकणाऱ्या महिलेस मारहाण करून दुकानाची तोडफोड करण्यात आली. तसेच खेळणी विक्रीतून जमा झालेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल भामट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली.
तालुक्यातील टाकळीमिया गावातील मियासाहेब यात्रेत लुटमार झाल्याची घटना यात्रा उत्सवास गालबोट लावणारी ठरली. टाकळीमिया येथील ग्रामदैवत मियासाहेब बाबा यात्रोत्सव असल्याने गावात विविध प्रकारची दुकाने लागली होती. श्रीरामपूर तालुक्यातील माळवडगाव येथील ममता दिलीप काळे या महिलेने यात्रेत छोटेसे खेळणीचे दुकान लावले होते. रात्री साडेआठ वाजे दरम्यान चार अनोळखी भामट्यांनी या खेळणी विक्री करणाऱ्या महिलेच्या दुकानावर जावून धिंगाणा घातला. महिलेला मारहाण करून दुकानातील सामानाची तोडफोड करून नुकसान केले. या पाठोपाठ साहित्य विक्रीतून जमा झालेली १६ हजार रुपयांची रोख रक्कम तसेच गळ्यातील २५ हजार रुपये किंमतीची एक तोळा वजनाची सोन्याची पोत जबरदस्तीने तोडून नेली.
या घटनेनंतर संबंधित महिलेने राहुरी पोलीसात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. महिलेच्या फिर्यादीवरून चार अनोळखी भामट्यांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सज्जन नारेडा करीत आहेत. यात्रेत खेळणी विक्रीसाठी आलेल्या महिलेला मारहाण करून पैसे व दागीने ओरबडून नेणाऱ्या चार भामट्यांचा राहुरी पोलिसांकडून शोध सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.