आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजन:अपंगत्व प्रमाणपत्रासाठी तालुकानिहाय शिबीरे

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दर बुधवारी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये अपंगत्वाचे प्रमाणपत्र व तपासणीसाठी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात दिव्यांग येत असल्यामुळे रुग्णालय प्रशासनाचे दैनंदिन नियोजन कोलमडून जायचे. आता जिल्हा शासकीय रुग्णालयाने ४ नोव्हेंबर पासून सर्व तालुक्यात प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी शिबिरे घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी दिली.

दर बुधवारी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने दिव्यांग येत होते. त्यामुळे दर बुधवारी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी दिव्यांगाची होत असल्यामुळे दैनंदिन बाह्य रुग्ण कक्षावर अतिरिक्त कामाचा ताण यायचा. शिवाय अनेकदा दिव्यांगाची हेळसांड देखील व्हायची. त्यामुळे आता नगर ४ नोव्हेंबर पासून बुधवार व्यतिरिक्त दर शुक्रवारी सकाळी ८ ते १२ या वेळेमध्ये दिव्यांग प्रमाणपत्र वाटपाचे कामकाज तालुकानिहाय केले जाणार आहे.

यात ४ नोव्हेंबरला राहूरी व नगर तालुका, ११ नोव्हेंबरला अकोले व संगमनेर, १८ नोव्हेंबरला राहाता व कोपरगाव, २५ नोव्हेंबरला नेवासा व शेवगाव, २ डिसेंबरला पाथर्डी व श्रीगोंदा, ९ डिसेंबरला जामखेड व कर्जत व १६ डिसेंबरला पारनेर व श्रीरामपूर या तालुक्यांसाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...