आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांची कारवाई:हातभट्टी दारू अड्ड्यावर तालुका पोलिसांची कारवाई

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर तालुका पोलिसांनी देशी-विदेशी दारूसह हातभट्टी दारू अड्ड्यांवर छापे टाकले. नगर तालुक्यातील साकत, भोरवाडी शिवारात बुधवारी ही कारवाई करण्यात आली. ६० हजार रुपये किंमतीचे एक हजार लीटर हातभट्टी तयार करण्यासाठी वापरणारे रसायन व ९६० रूपये किंमतीची देशी-विदेशी दारू जप्त केली आहे.

या प्रकरणी तिघांविरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आकाश महिपती पवार (रा. साकत), सुभाष भाऊसाहेब वाघ (वय ३२ रा. भोरवाडी) व राजू मैला पवार (रा. साकत) अशी दारू विक्री करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. भोरवाडी, साकत शिवारात अवैधरित्या देशी-विदेशी दारू व गावठी हातभट्टी दारू तयार करून विक्री केली जात असल्याची माहिती सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार योगेश ठाणगे, ज्ञानेश्‍वर खिळे, गांगर्डे आदींच्या पथकाने भोरवाडी व साकत शिवारात छापे टाकले. यावेळी देशी-विदेशी दारू, कच्चे रसायन असा सुमारे ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...