आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात अपंगत्वाचे प्रमाणपत्र वाटप करणार:शुक्रवारपासून तालुका निहाय शिबिराचे आयोजन; डॉ. संजय घोगरे यांची माहिती

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दर बुधवारी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये अपंगत्वाचे प्रमाणपत्र व तपासणीसाठी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात दिव्यांग येत असल्यामुळे रुग्णालय प्रशासनाचे दैनंदिन नियोजन कोलमडून जायचे. आता जिल्हा शासकीय रुग्णालयाने शुक्रवार 4 नोव्हेंबर पासून नगर जिल्ह्याच्या सर्व तालुक्यात अपंगत्वाचे प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी शिबिरे घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती बुधवारी (2 नोव्हेंबरला) जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी दिली

काय म्हणाले घोगरे?

डॉ.घोगरे म्हणाले‍, जिल्हा शासकीय रुग्णालयात दर बुधवारी दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटप व तपासणी केली जात होती. दर बुधवारी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने दिव्यांग येत होते. त्यामुळे दर बुधवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी दिव्यांगाची होत असल्यामुळे दैनंदिन बाह्य रुग्ण कक्षावर अतिरिक्त कामाचा ताण यायचा. शिवाय अनेकदा दिव्यांगाची हेळसांड देखील व्हायची. त्यामुळे आता अहमदनगर 4 नोव्हेंबर पासून बुधवार व्यतिरिक्त दर शुक्रवारी सकाळी 9 ते 12 या वेळेमध्ये दिव्यांग प्रमाणपत्र वाटपाचे कामकाज तालुकानिहाय केले जाणार आहे.

यात 4 नोव्हेंबरला राहूरी व अहमदनगर तालुका, 11 नोव्हेंबरला अकोले व संगमनेर, 18 नोव्हेंबरला राहाता व कोपरगाव, 25 नोव्हेंबरला नेवासा व शेवगाव, 2 डिसेंबरला पाथर्डी व श्रीगोंदा, 9 डिसेंबरला जामखेड व कर्जत व 16 डिसेंबरला पारनेर व श्रीरामपूर या तालुक्यांसाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. असे डॉ. घोगरे यांनी सांगितले. तालुका निहाय शिबिरामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात दर बुधवारी प्रमाणपत्र घेण्यासाठी दिव्यांगाची होणारी गर्दी काहीशी कमी होणार आहे असे त्यांनी सांगितले.

हे कागदपत्र आणावी...

प्रमाणपत्र घेण्यासाठी येणाऱ्या दिव्यांगांनी शिधापत्रिका, आधार कार्ड आणावे. प्रमाणपत्र वाटपासाठी घेण्यात येणाऱ्या शिबिरांसाठी येताना दिव्यांग व्यक्तींनी दोन पासपोर्ट साईज फोटो, शिधापत्रिका, आधार कार्ड व इतर औषधोपचारांच्या कागदपत्रांच्या छायाकिंत प्रती सोबत आणाव्यात. तसेच ज्या दिव्यांग व्यक्तींनी प्रमाणपत्रासाठी "ए" पार्ट भरलेला आहे. त्यांनी मूळ एस. ए.डी.एम. प्रमाणपत्र व भरलेल्या अर्जाची प्रत सोबत घेवून यावी. असे आवाहनही डॉ.घोगरे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...