आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर जिल्ह्यात 1.94 कोटीची वीजचोरी उघड:रिमोट सर्किटद्वारे वीज मीटरमध्ये छेडछाड; गुन्हा दाखल

अहमदनगर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीज बील कमी येण्यासाठी मीटरमध्ये छेडछाड करून तब्बल 1.94 कोटींची वीज चोरी केल्याची घटना आज उघडकीस आली आहे. या प्रकरणी महावितरणच्या भरारी पथकाचे कार्यकारी अधिकारी प्रदीप राधेशाम सावंत यांनी कर्जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हाही दाखल झाला.

छत्रपती जिंनिंग ॲन्ड प्रेसिंग प्रायव्हेट लिमिटेडचे वीज वापरदार राहुल भरत पवार व दादासाहेब अण्णासाहेब बांदल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 16 जून रोजी सावंत व भरारी पथकातील सहाय्यक अभियंता गफ्फार मेहताब शेख, कनिष्ठ अभियंता आशिष नरेंद्र नावकार, चाचणी विभागाचे उपकार्यकारी अभियंता सुधीर ओंकार किनगे, सहाय्यक अभियंता धनंजय त्रिंबक एकबोटे, प्रधान तंत्रज्ञ दत्तात्रय भाऊ पोटकुले यांनी मिरजगाव परिसरातील शिवाचा मळा रोड येथे छत्रपती जिंनिंग ॲन्ड प्रेसिंग प्रायव्हेट लिमिटेडचे वीज वापरदार पवार व बांदल यांच्या कंपनीमध्ये जाऊन वीज मिटरची तपासणी केली.

यात मीटरला येणारा इनकम्पिंग करंन्ट हा कमी प्रमाणात नोंद होईल व त्यामुळे वीज मीटरमध्ये कमी वापराची नोंद होईल, अशी कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात आल्याचे आढळले.

घटनास्थळा वरून वीज मीटर व त्यात टाकलेले रिमोट सर्किट भरारी पथकाने ताब्यात घेतले. वीज वापरदार बांदल यांनी वीज वापराची नोंद कमी प्रमाणात होईल अशी कायमस्वरूपी व्यवस्था करुन सहा महिन्यात 11 लाख 16 हजार 743 युनिट विजेची चोरी केल्याचे स्पष्ट झाल्याने व त्याचे अधिभारासह 1 कोटी 94 लाख 82 हजार 859 रुपये न भरल्याने सावंत यांनी त्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...