आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादुधाच्या टँकरची दोन दुचाकींना धडक बसून झालेल्या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. अकोले रस्त्यावर मंगळापूर शिवारात शुक्रवारी रात्री ८ वाजता हा अपघात झाला.
ऋषिकेश उमाजी हासे (वय २०), सुयोग बाळासाहेब हासे (वय २०) व नीलेश बाळासाहेब सिनारे (वय २६, चिखली, ता. संगमनेर) अशी मृत तरुणांची नावे आहेत. अपघातात संदीप भाऊसाहेब केरे (वय ३२) हा गंभीर जखमी झाला . चिखली येथे शनिवारी दुपारी मृत तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच गावातील हे तिघे मित्र असल्याने चिखली गावावर शोककळा पसरली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.