आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुकुंदनगर पाणीप्रश्नी नागरिकांनी नगरसेवक आसिफ सुलतान यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्त शंकर गोरे यांना घेराव घालून निवेदन दिले. प्रश्न मार्गी न लागल्यास मनपावर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. शहरातील काही भागात ५ ते ६ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. आयुक्तांनी याप्रश्नी आश्वासन देत नियमित पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले.
मुकुंदनगर ते दर्गा दायरा, अलमास पार्क ते राज नगर मधील नशेमन कॉलनी, जीशान कॉलनी, तरन्नुम कॉलनी, इशरत पार्क, मेहराज मस्जिद परिसर, एन.एम.गार्डन, सहारा सिटी, नम्रता कॉलनी, बजाज कॉलनी, दरबार कॉलनी, हुसेनीया कॉलनी, अमन कॉलनी, अमर कॉम्प्लेक्स, शहाशरीफ पार्क, राज नगर, दगडी चाल, संजोग नगर, मिलन कॉलनी, राजकोट चाल, अल्पना चाल, अभिलाषा कॉलनी, हिना पार्क, बिहारी चाल, हमीद पार्क, शहाजी नगर, क्लासिक कॉलनी, मोठी मरियम मस्जिद परिसर, इक्रा शाळा परिसर, दत्त मंदिर परिसर व इतर भागात ५ ते ६ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे.
पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार व आंदोलने केली आहेत. परंतु अद्यापही पाणीपुरवठा व्यवस्थित सुरळीत झालेला नाही. येत्या १० दिवसात प्रभागातील पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवावी. अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता प्रभागातील नागरिकांसमवेत हंडा मोर्चा काढण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष किरण काळे, नगरसेवक आसिफ सुलतान, अनिस चुडीवाला, मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, इम्रान बागवान, समीना शेख, रेशमा खान, शाहीन खान, सादिया सय्यद आदीसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.