आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:तपोवनचा पाणी पुरवठा आजपासून होणार सुरळीत

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बुऱ्हाणनगर हद्दीत असलेल्या एक लाख लोकसंख्येच्या तपोवन परिसराचा पाणीपुरवठा विस्कळीतच असून; सात दिवसांपासून पाण्यासाठी तपोवनकरांना भटकंती करावी लागत आहे. याच बुऱ्हाणनगर पाणी योजनेवर तपोवनसह ४४ गावे अवलंबून आहेत. दरम्यान ग्रामपंचायतीने बुधवारपासून या भागाचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी शक्यता वर्तवली आहे.

मुळा धरणातून बुऱ्हाणनगर पाणी पुरवठा योजनेतून तपोवनला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने १ जूनपासून पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामुळे तपोवन रोड व तपोवन नगर परिसरातील शिवाजीनगर, संत वामनभाऊ नगर सह अन्य भागातील पाणीपुरवठा गेल्या सात दिवसापासून बंद आहे.

मीटरद्वारे पाणी, तरीही पिण्याचे पाणी मिळेना
नगर शहराजवळील बुऱ्हाणनगर हद्दीत असलेल्या तपोवन परिसराला मीटरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. ३० रुपये युनिटने या भागात पाणीपुरवठा केला जातो मात्र वेळेवर पाणीपट्टी भरूनही या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...