आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इम्पॅक्ट:तारकपूर-मिस्किन मळा रस्त्याचे काम सुरू

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तारकपूर ते मिस्किन मळा रस्त्याचे नव्याने काम करण्यात आल्यानंतर अवघ्या चारच महिन्यात रस्ता उखडला गेला. एकाच पावसात रस्त्याची दुरवस्था झाल्याकडे दिव्य मराठीने वृत्त प्रकाशित करून महापालिकेचे लक्ष वेधले होते. त्यानंतर महापालिकेने ठेकेदाराला नोटीस बजावून रस्त्याची दुरुस्ती व त्यावर पुन्हा डांबरीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. बुधवारी सकाळपासून या कामाला सुरुवात झाली आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी तारकपूर ते मिस्किन मळा रस्त्याचे काम महापालिकेकडून हाती घेण्यात आले होते. सुरुवातीला रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात आले होते. त्यावर डांबरीकरणाचा एक थर करणे अद्यापही बाकी होते. मात्र, तत्पूर्वीच पावसाळ्यात रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला. रस्त्यावर खड्डे पडून इतरत्र खडी पसरली. दिव्यमराठीने याबाबत वृत्त प्रकाशित करून महापालिकेचे लक्ष वेधले होते. त्यानंतर मनपाचे शहर अभियंता सुरेश इथापे यांनी ठेकेदार संस्थेला कामापोटी अदा केलेले ४८ लाख रुपये परत जमा करून घेण्याची नोटीस बजावली.

खराब झालेले मजबुतीकरणाचे काम पुन्हा करून त्यावर डांबरीकरण करण्याचे आदेश ठेकेदाराला देण्यात आले आहेत. बुधवारी सकाळी ठेकेदाराकडून हे काम सुरू करण्यात आले आहे. शहर अभियंता इथापे, अभियंता मनोज पारखे यांनी या कामाची पाहणी करून ठेकेदाराला कामाचा दर्जा चांगला ठेवण्याबाबत सूचना दिल्या. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर तात्काळ डांबरीकरणाचे काम करण्यात येणार असल्याचे इथापे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...