आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक उपक्रम:28 शाळांना शिक्षक बँक देणार डिजिटल फळा

नगर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेचे कर्मचारी सभासद असलेल्या जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या वेतनातून कर्जाची हप्ते कपात करण्याच्या बदल्यात बँकेकडून शैक्षणिक उपक्रमासाठी सेवा मोबदला देण्याची अट जिल्हा परिषदेने घालून, २० कोटींची वेतन कपात रोखली. बँक स्तरावर वसुलीस अडचणी येऊ नयेत यासाठी बँकेने एक पाऊल मागे घेत २८ शाळांना डिजिटल फळे देण्याची सहमती दर्शवल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून समजली. त्यामुळे आता पुढील कालावधीत जिल्हा परिषद हप्ते कपात करणार आहे.

जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे सुमारे दहा हजार पाचशे शिक्षक शिक्षक बँकेचे सभासद आहेत. बँकेने सुमारे ९२७ कोटींचे कर्ज वाटप केले आहे. कर्जदारांकडून दरमहा सुमारे १९ ते २० कोटी रुपये कर्जापोटी हप्ता वसूल बँकेत येणे आवश्यक आहे. कर्जाच्या हप्त्याची रक्कम पूर्वीपासून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फतच कपात करून बँकेला जमा केली जाते. त्यामुळे शंभर टक्के वसुली होऊन बँकेचे रेकॉर्डही चांगले राहिले आहे.

परंतु शिक्षण समितीच्या झालेल्या एका बैठकीत, पुढील कालावधीत बँकेचे वसूल वेतनातून करण्याच्या मोबदल्यात शैक्षणिक उपक्रमावरील खर्चासाठी सेवा मोबदला देण्याचे पत्र शिक्षण विभागाने शिक्षक बँकेला ३० ऑगस्ट २०२२ रोजी दिले होते. याच पत्रात स्टेशनरीचा अतिरिक्त भार कमी करण्यासह शाळांना भौतिक सुविधा देण्यासाठी नवीन करार करण्याची सूचनाही पत्राद्वारे केली होती.समाधानकारक तोडगा न निघाल्याने ऑक्टोबर महिन्याचे वेतन नोव्हेंबर मध्ये करताना हप्ते कपात थांबवून जिल्हा परिषदेने बँकेला दणका दिला. त्यानंतर बँकेने एक पाऊल मागे घेऊन २८ शाळांना डिजिटल बोर्ड देण्याची तयारी दर्शवली, अशी माहिती शिक्षण विभागाकडून समजली.

बँकेकडून अद्याप पत्र नाही
जिल्ह्यात शैक्षणिक उपक्रमांतर्गत २८ शाळांना डिजिटल बोर्ड उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. याबाबत बँकेकडून अद्याप पत्र आलेले नाही.''-भास्कर पाटील, जिल्हा शिक्षणाधकारी.

बातम्या आणखी आहेत...