आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन:अमृतवाहिनीत शिक्षक गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम यशस्वी

संगमनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या उच्च व गुणवत्ता पूर्ण शिक्षणाने देशात मानाचे स्थान निर्माण करणाऱ्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात पीएचडी संशोधन केंद्रामार्फत दोन दिवसीय शिक्षक गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश यांनी दिली. ते म्हणाले, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय हे देशातील गुणवत्तेचे महाविद्यालय ठरले आहे.

विविध मानांकनासह नेक ‘अ’ प्लस दर्जा मिळवणारे हे महाविद्यालय आहे. नुकतेच या महाविद्यालयातील सिव्हिल विभागाच्या पीएचडी संशोधन केंद्रामार्फत दोन दिवसाचे शिक्षक गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हवामानातील बदल, जलाशय व शेती नियोजन व व्यवस्थापन, शेती व्यवस्थापनातील बहुआयामी निर्णय क्षमता अनिश्चित हाताळण्याचे तंत्रज्ञान या विषयावर विविध प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले. शेती आधारित असलेला हा गुणवत्ता सुधार कार्यक्रम अतिशय यशस्वी ठरल्याचे समन्वयक जी. बी. गुरव यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, रजिस्टर प्रा. विजय वाघे, विभाग प्रमुख प्रा. डॉ. मधुकर वाकचौरे यावेळी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...