आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांचा सन्मान:लायन्स क्लब संस्कृतीतर्फे शिक्षकांचा सत्कार

खामगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील अ.खि.नॅशनल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शिक्षक दिनी शिक्षकांचा सन्मान करण्याचे लायन्स क्लब संस्कृतीच्या वतीने ठरले होते. त्या अनुषंगाने ६ सप्टेंबर रोजी नॅशनल हायस्कूल मधील सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी प्राचार्या शहा, उपमुख्याध्यापक गव्हांदे, उपप्राचार्या सोनटक्के, सुपरवायझर दिगंबर, के.आर.तायडे, जोहरी, सोळंके, के.एस.चव्हाण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या प्रसंगी शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा भेट वस्तु देवुन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन संजय उमरकर यांनी तर आभार प्रदर्शन शैलेश शर्मा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी लायन्स क्लब संस्कृतीचे अध्यक्ष विरेंद्र शहा, सचिव उज्ज्वला उमरकर, कोषाध्यक्ष नरेश चोपडा, प्रकल्प प्रमुख सुशील मंत्री, सीमा मंत्री, अजय छतवाणी,डिम्पल शहा, तनुश्री शर्मा, डॉ.गुलाब पवार यांनी परिश्रम घेतले, अशी माहिती राजकुमार गोयनका यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...