आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:शिक्षक संपाच्या तयारीत

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिक्षक दिनी काळ्या फिती लावून शिक्षकांनी आंदोलन केले होते. तथापि, प्रश्न सुटलेच नाही, त्यामुळे बेमुदत संप तसेच परीक्षांवर बहिष्कार घालण्याचे हत्यार उपसण्याची तयारी शिक्षकांनी केली आहे. शिक्षक संघटनेने शिक्षणविभागाला तसे निवेदन दिले आहे.अंशत: अनुदानावरील नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सेवानिवृत्तांना या योजनेचा तातडीने लाभ द्यावा.

१ नोव्हेंबर कनिष्ठ महाविद्यालयाला प्रचलित अनुदानसूत्र तातडीने लागू करावे आदी विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला होता. शिक्षक दिनी ५ सप्टेंबरला राज्यातील सर्व जिल्ह्यात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. तथापि, शासनाने दखल घेतली नाही.

आता निकाली न काढल्यास महासंघ पुढील काळात परीक्षेवर बहिष्कार, बेमुदत संप पुकारून आंदोलन करणार आहे, असा इशारा दिला आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. नवनाथ टकले विलास वाळुंजकर, राजेंद्र जाधव, प्रा. दत्तात्रय आहेर, प्रा. आकाश नढे, प्रा. सईद सय्यद, प्रा. एन.के. शेख, प्रा. दत्तात्रय नकुलवाड आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...