आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक दिन:शिक्षकांमुळे सामाजिक स्वास्थ्य टिकून ; जगताप, यशवंत गाडे विद्यालयात विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

नगर तालुकाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोठा वाटा असतो. शिक्षकांमुळेच सामाजिक स्वास्थ्य टिकून आहे. शिक्षकांबद्दल अपशब्द बोलताना आत्मपरिक्षण करूनच बोलावे कारण तो जीवनाला आकार देणारा शिल्पकार आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.फकिरवाडा ( मुकुंदनगर ) येथील यशवंत गाडे माध्यमिक विद्यालय व श्री गणेश बालक मंदिर मध्ये शिक्षक दिन व गरजू मुलांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले . यावेळी आमदार जगताप अध्यक्षपदावरून बोलत होते . त्यांच्या हस्ते सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला, तसेच संस्थेचे सहसचिव रमाकांत गाडे यांच्या वतीने गरजू मुलांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले.

यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. दिलीप बागल, सचिव हरिश नय्यर, नगरसेवक बाळासाहेब पवार, योगिराज गाडे, नगरसेविका ज्योती गाडे व संस्था पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. बागल म्हणाले, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर शिक्षकांची आठवण येते. त्यांच्यामुळेच सृजनशिल समाजाची निर्मिती होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष एम. पी. कचरे, खजिनदार संजय गाडे, संचालक हरिदास डोके, ज्ञानदेव पाडुंळे, आसाराम म्हस्के, सामाजिक कार्यकर्ते सुनील बेरड, फकिरमहंमद शेख व पालक उपस्थित होते. स्वागत उद्धव गुंड यांनी, प्रास्ताविक मुख्याध्यापक डॉ. निशात शेख यांनी, सुत्रसंचालन योगेश गुंड यांनी, तर आभार आदिनाथ लवांडे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...