आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहर येथील बाळासाहेब भारदे हायस्कूलमधील उपक्रमशील शिक्षक उमेश घेवरीकर यांनी दिगदर्शित केलेल्या व याच शाळेतील डॉ. सपना कुलकर्णी यांची संकल्पना, कथा व संवाद असलेल्या ‘संप्रदानम’ या संस्कृत लघुपटाने संस्कृत भारती या संस्थेने आयोजित केलेल्या चवथ्या विश्व संस्कृत लघुपट महोत्सवात दोन पुरस्कारांवर मोहोर उमटवली. या लघुपटातील प्रमुख भूमिकेसाठी विद्या जोशी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला असून लघुपाप स्पेशल ज्युरी अवॉर्ड मिळाले. जगभरातील शंभराहून अधिक लघुपट या महोत्सवात दाखल झाले होते.
यातील आठ लघुपटांचे प्रदर्शन २७ जानेवारी रोजी नागपूर येथील रेशीम बाग येथे घेण्यात आले. याच समारंभात विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कृत कऱण्यात आले. विद्या जोशी, संकेत खेडकर, विराज अवचिते, सपना कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या लघुपटाच्या तांत्रिक बाबी कृष्णा जवरे, सोमा शिंदे, सारंग देशपांडे यांनी सांभाळल्या आहेत.
अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित करणारा अवघ्या सात मिनिटांचा हा लघुपट असून आधुनिक साधने हाताशी नसताना अडचणींवर मात करत शेवगावसारख्या ग्रामीण भागातील कलाकारांनी घेतलेली ही आंतरराष्ट्रीय महोत्सवातील झेप शेवगावची शान उंचावणारी ठरत आहे. या संघाचे प्रा. रमेश भारदे, एजाज काझी, हरीश भारदे, बापूसाहेब गवळी, भाऊ काळे, श्रीकांत कुलकर्णी, डॉ. मंजूषा कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.