आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्यात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी शिक्षकांनी विशेष योगदान देण्याची गरज ओळखून शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांकडून नियमित पुस्तके वाचून घेण्यावर भर दिला पाहिजे. हल्ली छापील साहित्य निर्माण होत नाही, त्यातूनच दर्जेदार छापील साहित्य निर्माण करून युनिक फ्युचर्स विद्यार्थ्यांच्या आयुष्याची शिदोरी निर्माण करत आहे, असे गौरवोद्गार पुणेस्थित युनिक फ्यूचरचे तज्ञ सचिन घोडेस्वार यांनी काढले.
अकोले तालुक्यातील कळसुबाई माध्यमिक विद्यालयात व चिचोंडी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत आयोजित कार्यक्रमात ते बाेलत होते. बायफ संस्था पुणे संचलित समृद्ध किसान प्रकल्पाचे अंतर्गत समाविष्ट कळसुबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बारी, तसेच नूतन माध्यमिक विद्यालय पांजरे, जि. प. प्राथमिक शाळा चिचोंडी व मुरशेत शाळांमधील सुमारे ५०० विद्यार्थ्यांना एएसके फाउंडेशन मुंबई संस्थेकडून पासवर्ड उपक्रमांतर्गत प्रत्येकी पाच पुस्तकांचा संच देण्यात आले. पुणे येथील युनिक फ्युचर्स अँड न्यूज प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून समकालीन प्रकाशनने प्रकाशित पाच पुस्तकांचा संच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आला. बायफचे प्रकल्प समन्वयक विष्णू चोखंडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन बायफचे केंद्र समन्वयक राम कोतवाल यांनी, तर नियोजन मच्छिंद्र मुंडे यांनी केले. याप्रसंगी प्राचार्य आर. सी. जाधव, शिक्षक आर. डी. कानवडे, एस. के. खाडे, चिचोंडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक एस. इ. पठाण, शिक्षक डी. एस. मुंढे, एस. आर. सुकटे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.