आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमशेरपूर येथे ५० वर्षांपूर्वी घेतलेल्या स्काऊट गाईडच्या संस्कार शिबिरात मी सहभागी झालो होता. या प्रकारच्या शिबिरातून स्वयंसेवकात स्वयंशिस्त, श्रम प्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी, सहिष्णुता व देशप्रेम यांची मूल्य रुजविली जातात. राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून तयार झालेले स्वयंसेवक हे श्रम व सेवाभावी वृत्तीने राष्ट्र उभारणीसाठी धडपडत असतात. अशी श्रम व सेवा संस्कार शिबिरे विद्यार्थ्यांना जीवन जगायची शिकवण देतात, असे आवाहन विधानपरिषद आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
शिक्षण उपसंचालक पुणे विभाग व हिंद सेवा मंडळ अहमदनगर संचलित, मॉडर्न हायस्कूल व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, सोममचंद शहा कॉमर्स व भास्करराव कदम (गुरुजी) सायन्स कॉलेज अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने अकोले तालुक्यात देवठाण येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी अरुण शेळके, सरपंच निवृत्ती जोरवर, उपसरपंच आनंदा गिर्हे, प्राचार्य संतोष कचरे, उपप्राचार्य दीपक जोंधळे, योगेश देशमुख, कार्यक्रम अधिकारी संपत वाळके, मंगल कोल्हे, केदार भिंगारदिवे, ऋषिकेश नगरकर आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार तांबे म्हणाले, शिबिरातून ग्रामीण भागाच्या विकासात स्वच्छता, आरोग्य, महिला सबलीकरण, व्यक्तिमत्व विकास, पर्यावरण संवर्धन आदींसह स्वयंशिस्त, श्रम प्रतिष्ठा, सहिष्णुता व राष्ट्रप्रेम विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे काळाची गरज बनली आहे. आमदार तांबे यांनी या शिबिरातून स्वयंसेवकांनी स्वयंशिस्त्व पाळून केलेल्या कामाची माहिती घेऊन खासकरून विद्यार्थी स्वयंसेवकांचे कौतुक केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.