आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचाऱ्यांना तंबी:कर्मचारी उपस्थितीच्या तपासणीसाठी पथक ; मनपा आयुक्तांचे आदेश

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपा कार्यालयांत कार्यालयीन वेळेत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश मनपा आयुक्त पंकज जावळे यांनी काढले आहेत. कार्यालयात अचानक तपासणी करण्यासाठी भरारी पथकाची स्थापनाही त्यांनी केली आहे. कार्यालयातून बाहेर पडताना हालचाल रजिस्टरला नोंद न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना दिला आहे. कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत दिव्यमराठीने वृत्त प्रकाशित केल्यानंतर मनपा आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत आदेश जारी केले आहेत.

कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहत नसल्याबाबत तक्रारी वाढत आहेत. सकाळी कार्यालयीन वेळेत व दुपारच्या जेवणाच्या सुट्टीनंतर कर्मचारी कार्यालयात हजर होत नाही, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अचानक तपासणी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त कर व उपायुक्त सामान्य या तिघांच्या तीन पथकांची स्थापना करण्यात आली आहे. कार्यालयीन विभागांना सकाळी अथवा दुपारी वारंवार अचानक भेटी देऊन कर्मचारी उपस्थितीबाबत तपासणी करावी. अनुपस्थीत कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन दंडात्मक आकारणी करावी व सेवा पुस्ताकामध्ये नोंद घ्यावी. प्रथम वेळी ३००, दुसऱ्या वेळी ७०० व तिसऱ्या वेळी १५०० रुपये दंडात्मक आकारणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

दरम्यान, कार्यालयीन कामकाजासाठी बाहेर जाताना व आल्यानंतर हालचाल रजिष्टरला नोंद करावी. तपासणीच्या वेळी हालचाल रजिष्टरला नोंद नसल्यास कार्यालयातील अनुपस्थीती समजली जाईल व दंडात्मक कारवाई करण्यात येईल. विभाग प्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी तंबीही आयुक्तांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...