आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामानवाने आपल्या मनातील द्वेषाच्या भिंती जमीनदोस्त करुन प्रेमाचे पूल उभारावेत. या जगात आपण मानव म्हणून जन्माला आलो आहोत, तर उदात्त मानवी मूल्ये व दिव्य गुणांनी युक्त जीवन जगायला हवे, असे प्रतिपादन निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या ५६ व्या वार्षिक निरंकारी संत समागमात केले. औरंगाबादच्या बिडकीन डीएमआयसी परिसरात सुमारे ३०० एकरावर तीन दिवसीय विशाल निरंकारी संत समागम नुकताच पार पडला. नगरसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि देशभरातून लाखोंच्या संख्येने जनसागर येथे लोटला होता.
या तीन दिवसीय समागमाचा प्रारंभ शोभायात्रेने झाला. त्यात बंजारा नृत्य, कोळी नृत्य, तारणा नृत्य, आदिवासी नृत्य, दिंडी-वारकरी, ढोल पथक आदींचा समावेश होता. भक्तांनी समागमाचा मुख्य विषय ‘आत्मिकता व मानवता संगे संगे’ या विषयावर विचार, गीत, भजन, कवितांच्या माध्यमातून प्रकाश टाकला. समागमाच्या दुसर्या दिवशी सकाळच्या सत्रात प्रभावशाली सेवादल रॅली पार पडली. या रॅलीत सेवादलाद्वारे लघुनाटिका, विविध खेळ, शारीरिक कवायती, योगा व मल्लखांब आदी प्रकार सादर केले. दुपारी सत्संगाच्या खुल्या सत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली.
कायरो प्रॅक्टीस उपचार पद्धतीद्वारे विदेशी डॉक्टरांच्या पथकाने रुग्णांच्या पाठीच्या मणक्यावर विशिष्ट उपचार केले. त्याचा सहा हजारांहून अधिक गरजूंनी लाभ घेतला. समागम स्थळी डिस्पेंसरी, प्रकाशन स्टॉल लावले होते. भाविकांसाठी २४ तास लंगर सेवा सुरु होती. भाविकांची राहण्याची व्यवस्था प्रशस्त तंबूमध्ये केली होती. त्यांच्यासाठी वीज, पाणी, स्वच्छतागृह आदीची सुंदर व्यवस्था केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.