आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरव्यवहार:तहसीलदार देवरेंच्या गैरव्यवहाराचा अहवाल सादर केला नाही

पारनेर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गैरव्यवहार व गैरप्रशासनाचे आरोप असलेल्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावरील आरोपांबाबत स्पष्टीकरण असणारा चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारला सादर केला नसल्याने राज्याचे लोकायुक्त न्यायाधिश विद्याधर कानडे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर गौण खनीजासंदर्भातील काही माहिती अपुरी असल्याने चौकशी अहवाल पाठवण्यास विलंब झाला असल्याचे नाशिक विभागीय उपायुक्त गोरक्षनाथ गाडिलकर यांनी सांगितले.

तहसीलदार देवरे या पारनेर व धुळे येथे कार्यरत असताना त्यांनी कोट्यवधींचा गैरव्यवहार केला असल्याचा आरोप करत वकील राहुल झावरे,संदीप चौधरी, बाळासाहेब लंके, सुहास सालके यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे. या तक्रारींवर सोमवारी दूरश्राव्य पद्धतीने सुनावणी झाली. यावेळी लोकायुक्त विद्यासागर कानडे, नाशिक विभागिय उपायुक्त गोरक्ष गाडीलकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले,तक्रारदारांचे कायदेतज्ञ असीम सरोदे यांच्यासह चारही तक्रारदार उपस्थित होते.

सुपे औद्योगिक वसाहतीमधील मींडा, मायडीया या कंपन्यांमधील तसेच तालुक्यात इतरत्र गौण खनिजाची बेकायदेशीररीत्या वाहतूक करणारांना महसूल पथकाने वाहनांसह ताब्यात घेतले मात्र तहसीलदार देवरे यांनी कोणतीही कारवाई न करता त्यांन मुक्त केले. याबाबत तक्रारदारांनी पुराव्यासह लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे. मात्र त्याबद्दल अहवालात नमूद केलेले नाही. याकडे वकील असीम सरोदे यांनी लोकायुक्त न्या.कानडे यांचे लक्ष वेधले. देवरे यांची गैरव्यवहार करण्याची पद्धती, प्रक्रियाच जर नमूद केली नाही, असे वकील सरोदे यांनी लोकायुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.त्यावर आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश लोकायुक्तांनी जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांना दिले व त्यावर पूर्तता करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केले.

बातम्या आणखी आहेत...