आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संप सुरूच:तहसीलदार- नायब तहसीलदारांचा सलग चौथ्या दिवशी संप सुरूच; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

अहमदनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महसूल विभागातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या वेतन श्रेणीतील त्रुटी दूर कराव्यात या मागणीसाठी आजही तहसिलदारांनी व अधिकाऱ्यांनी संप सुरूच ठेवला.संपाच्या चौथ्या दिवशी राजपत्रित अधिकारी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत वेतन श्रेणीतील त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी केली.

गेल्या तीन दिवसापासून महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना नगर शाखेच्या वतीने नायब तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांनी संप सुरू केला होता.

महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना नगर शाखेच्या पदाधिकारी तथा नायब तहसीलदार माधुरी आंधळे , नायब तहसीलदार किरण देवतरसे, नायब तहसीलदार अभिजीत वांडेकर , नायब तहसीलदार कैलास साळुंके, योगेश कुलकर्णी , शंकर रोडे, वरदा सोमण, पंकज नेवसे , मनोज मोसेकर,भामरे, रणदिवे, चितांमणी आदी नायब तहसीलदार या आंदोलनात सहभागी झाली होते.

काय आहेत मागण्या?

माधुरी आंधळे म्हणाल्या, आम्हाला वेतन वाढ नको आहे पण वेतनातील त्रुटी दूर होणे आवश्यक आहे.महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना नगर शाखेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग दोन पदाची वेतनश्रेणी व ग्रेड पे 4600 रुपये करावे, या प्रमुख मागणीसाठी हे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे.

मागणीकडे दुर्लक्ष

दर्जा वर्ग 2 चा मग वेतनश्रेणी वर्ग 3 ची का असा सवाल संघटनेच्या पदाधिकारी माधुरी आंधळे यांनी करून तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेने 1998 पासून वारंवार तहसीलदार राजपत्रित वर्ग 2 यांना इतर समक्ष वर्ग 2 पदाची वेतनश्रेणी लागू करावी यासाठी निवेदने, प्रत्यक्ष भेटून भूमिका मांडली आहे.तरी देखील संघटनेच्या या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने आम्ही हे काम बंद आंदोलन सुरू केले आहे. असे आंधळे यांनी सांगितले. दरम्यान, तहसीलदारांच्या संपामुळे कामकाज ठप्प झाले आहे.