आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीगोंद्यात तहसीलदारांची वाळूतस्करांवर कारवाई,:20 लाखांच्या 2 बोटी उद्ध्वस्त

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे तालुक्यातील तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी आर्वी व अजनुज येथे सुरू असलेल्या विना परवाना वाळूउपसा करत असलेल्या दाेन बोटी रंगेहात पकडून 20 लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. तहसीलदारांनी जिलेटिनच्या साहाय्याने बोटी नष्ट केल्या. ही कारवाई रविवारी सायंकाळी करण्यात आली.

श्रीगोंदे तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात रात्रंदिवस राजरोसपणे अनेक दिवसांपासून वाळूउपसा होत असल्याची माहिती तहसीलदार मिलिंद कुलथे यांना समजली. त्यानुसार, रविवारी, 6 नोव्हेंबर रोजी तहसीलदार कुलथे व त्यांच्या पथकाने आर्वी व अजनुज या ठिकाणी भीमा नदी पत्रात वाळू उपसा करत असणारी बोट दिसून आली. तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्या पथकाला पाहताच वाळूचोरी करणारे बोटीवरील चालक व इतर कर्मचारी पळून गेले. मात्र, तहसीलदार कुलथे यांनी 20 लाख रुपये किमतीच्या दोन्ही बोटी जिलेटीनच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या.

श्रीगोंदे तालुका वाळू उपशाबाबतीत जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. वाळूतस्कर वाळू चोरी करण्यासाठी तहसीलदार व पोलिस अधिकारी यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी वाळू माफियांचे पंटर चौकाचौकात बसून एकमेकांना खबर देत असतात. यामुळे अवैध वाळूची वाहतूक शहरातून सुरळीतपणे तालुक्यात होत असते.

अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला हजर झाल्यापासून वाळू तस्करीला आळा बसला आहे. श्रीगोंदे तालुक्याचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांचा सुद्धा श्रीगोंदे तालुक्यात अवैध धंदे व वाळू तस्करांनी धसका घेतला आहे.

अल्पावधीमध्ये श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी वाळूमाफियांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागलेली आहे. नवीन तरुण मुले वाळू तस्करीकडे वळू लागली आहेत. त्यातूनच गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात उदयास आली आहे. परंतु पाेलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामराव ढिकले श्रीगोंद्यात आल्यापासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी नष्ट केली. तसेच श्रीगोंदे तालुक्यातील अवैध वाळूतस्करांच्या मुसक्या आवळण्यात यश येत आहे. दरम्यान, वाळूतस्करीवर अंकुश लागत असल्याने श्रीगोंदे तालुक्यातील गुन्हेगारीचे प्रमाण घटत आहे.

बातम्या आणखी आहेत...