आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रापेक्षा तेलंगण राज्य छोटे व नव्याने निर्मित असूनही तेथे शिक्षण, आरोग्य, कृषी, उद्योग, व्यापार आदींसह विविध क्षेत्रातील विकास केवळ नजरेत भरणाराच नव्हे, तर तो देशात उल्लेखनीय आहे. दरवर्षी पेरणी हंगामपूर्वीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात न मागताच १० हजारांचे अनुदान जमा करण्यात येते. शेतीस वीज व पाणी मोफत उपलब्ध आहे. रस्ते दर्जेदार व विकास कामे उल्लेखनीय आहेत. उद्योजक, शेतमजूर, कष्टकरी व शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना तेलंगणा राज्यातील केसीआर पेटर्नस् प्रशासन कामकाज समाधानकारक वाटते.
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर तथा के. चंद्रशेखर राव यांच्याप्रमाणे दूरदृष्टी अन्य राज्यात का नाही? हे महाराष्ट्रातील नागरिकांनी सतर्क होत नांदेड येथील जाहीर सभेतून समजावून घेऊन महाराष्ट्रात केसीआर पॅटर्न राज्यभर राबवण्याची गरज आहे, असे आवाहन भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी दशरथ सावंत व निवृत्त शासकीय अधिकारी बी. जे. देशमुख यांनी केले.
अकोल्यात सार्वजनिक बांधकाम विभाग विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत भारत राष्ट्र समितीत सामिल सावंत व देशमुख बोलत होते. पत्रकार परिषदेस सोमनाथ थोरात, भानुदास देशमुख, अशोक धुमाळ, संदीप शेणकर आदींसह शेतकरी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, इथल्या राज्यकर्त्यांना तेलंगणाच्या विकासाभिमुख ध्येयधोरणानुसार काम करणे शक्य का होत नाही? तर अशुद्ध हेतू व स्वार्थी विचाराबरोबरच जनतेच्या भावनाशी खेळत सत्ता काबीज करण्याचे ते कधी थांबवणार नाही. म्हणूनच महाराष्ट्रात सकारात्मक बदलासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचे नेतृत्व हवे. त्यासाठी महाराष्ट्रासह तेलंगणा शेजारील ७ राज्यातून भारत राष्ट्र समितीचे कार्यास सुरुवात झाली.
या दृष्टीने भारत राष्ट्र समितीत सुमारे एक हजार पदाधिकाऱ्यांकडून महाराष्ट्रात २२४ मतदारसंघात प्रचार व प्रसार करण्याचे नियोजन आहे. याची सुरुवात ५ फेब्रुवारीपासून नांदेड येथून जाहीर सभेने करण्यात येत आहे, अशी माहिती दशरथ सावंत, देशमुख यांनी दिली. सावंत व देशमुख म्हणाले, शासनाच्या सहभागाशिवाय शेती व शेतकरी ऊर्जितावस्थेत आणण्याचे प्रयत्न निष्फळ आहेत.
तेलंगण शेतकऱ्यांचा केसीआर यांच्यावरील विश्वास व शेतकऱ्यांना मिळणारे लाभ पाहता उशिराने का होईना. पण आमच्याही ते लक्षात आले. केसीआर यांच्या कार्यपद्धतीवर महाराष्ट्राचा विकास झाल्यास शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक सुखी करण्याचे प्रयत्न अधिक सुकर व गतिमान होतील. आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहोत. पण तेलंगणात मुख्यमंत्री केसीआर जे अल्पावधीत तेथे करू शकले ते महाराष्ट्रासह अन्य राज्यातील नामवंत कृषीतज्ञ, राजकीय नेते, विचारवंत ७५ वर्षांत करू शकले नाहीत, ही शोकांतिका आहे. यामुळेच यापुढील काळात तरी केसीआर यांच्या शिवाय महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती वेगवान होईल, असे सुतराम वाटत नाही, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नांदेड येथे ५ फेब्रुवारीला केसीआर यांची जाहीर सभा केसीआर यांच्या तेलंगण राज्यातील कृषी पॅटर्नची देशाला गरज आहे. हा केसीआर पॅटर्न समजून घेण्यासाठी नांदेड येथे ५ फेब्रुवारी रोजी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. राज्यातील कामगार, शेतमजूर, व्यावसायिक, नोकरदार, शेतकऱ्यांसह सर्व क्षेत्रातील जाणकार व नागरिकांनी या सभेस उपस्थित राहून सर्वांगीण विकासाचा केसीआर पॅटर्न महाराष्ट्रात राबवण्यास आपले समर्थन द्यावे, असे आवाहन शेतकरी नेते दशरथ सावंत, बी. जे. देशमुख व सोमनाथ थोरात यांनी केले.
नांदेड येथे ५ फेब्रुवारीला केसीआर यांची जाहीर सभा केसीआर यांच्या तेलंगण राज्यातील कृषी पॅटर्नची देशाला गरज आहे. हा केसीआर पॅटर्न समजून घेण्यासाठी नांदेड येथे ५ फेब्रुवारी रोजी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. राज्यातील कामगार, शेतमजूर, व्यावसायिक, नोकरदार, शेतकऱ्यांसह सर्व क्षेत्रातील जाणकार व नागरिकांनी या सभेस उपस्थित राहून सर्वांगीण विकासाचा केसीआर पॅटर्न महाराष्ट्रात राबवण्यास आपले समर्थन द्यावे, असे आवाहन शेतकरी नेते दशरथ सावंत, बी. जे. देशमुख व सोमनाथ थोरात यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.