आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहरम उत्सव:मिरवणुकीत टेंभ्यांना मिळणार परवानगी ; मुस्लिम संघटनांची मागणी

नगर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहरम उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या कत्तलची रात्र मिरवणुकीत यावर्षी टेंभ्यांना परवानगी देण्याचा निर्णय जिल्हा पोलिस प्रशासनाने घेतला आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी बुधवारी सकाळी पुन्हा या संदर्भात बैठक घेतली. यात मुस्लिम संघटनांची मागणी मान्य करत टेंभ्यांना परवानगी देण्यात आल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

अप्पर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या उपस्थितीत मंगळवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली होती. मिरवणुकीत टेंभ्यांना परवानगी मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. अधीक्षक पाटील यांनी बुधवारी पुन्हा बैठक घेऊन चर्चा केली. रीतसर परवानगी घेऊन व किमान दहा व्यक्तींची नावे देऊन संबंधित यंग पार्टीला टेंभ्यांना परवानगी दिली जाईल. कोणत्याही परिस्थितीत डीजेला परवानगी दिली जाणार नाही, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...