आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​भूमिपूजन:मंदिरे पूजाअर्चाची ठिकाणे नसून आत्मसन्मानाची प्रतिके ; हिंदू समाज संघटित होतोय

अकोले7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्र मंदिर, मथुरेतील भगवान श्रीकृष्ण मंदिर, वाराणसीतील काशी विश्वेश्वर मंदिर, ही केवळ पूजाअर्चा करण्याची ठिकाणे नसून ती देशाच्या आत्मसन्मानाची व शौर्याची प्रतीके आहेत. मंदिर ही दगडाची वास्तू न रहाता ती हिंदूंची संस्कार केंद्र व्हावीत, असे आवाहन देवगड येथील श्रीदत्त देवस्थानचे प्रमुख महंत व विश्व हिंदू परिषदेचे मार्गदर्शक भास्करगिरी महाराज यांनी केले.

गऊबाई सीताराम गिते यांनी दान दिलेल्या जागेवर विश्व हिंदू परिषद अकोले प्रखंड यांच्या माध्यमातून नियोजित श्रीइच्छामणी गणेश मंदिर भूमिपूजन समारंभ प्रसंगी भास्करगिरी महाराज बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री मधुकर पिचड, आमदार डॉ. किरण लहामटे, नगराध्यक्ष सोनाली नाईकवाडी, विश्व हिंदू परिषदेच्या अखिल भारतीय सत्संगाचे प्रमुख दादा वेदक, क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर, धर्माचार्य संपर्कप्रमुख हभप माधवदास राठी, प्रांत सहमंत्री सतीश गोरडे, प्रांत मठ मंदिर प्रमुख मनोहर ओक उपस्थित होते.

शंकर गायकर म्हणाले, नगर हा विश्व हिंदू परिषदेच्या विचाराने भारलेला जिल्हा आहे. गणेश मंदिर भूमिपूजन झाल्याने व मंदिराची मुहूर्तमेढ झाल्याने आंतरिक भाव प्रगट झाला. तर दादा वेदक म्हणाले, हिंदू समाज संघटित होत असून तो परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. हा देश नररत्नांची भूमी असून मंदिरे ही शक्ती केंद्रे आहेत. माधवदास राठी, आमदार किरण लहामटे यांची भाषणे झाली. मंदिरासाठी विशेष योगदान देणाऱ्या मान्यवरांचा भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी आमदार वैभव पिचड, भाजप तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, प्रा. एस. झेड. देशमुख, डॉ.जयराम खंडेलवाल, पर्वत नाईकवाडी, सुनील दातीर, राजेंद्र गोडसे, के.डी.धुमाळ, महेश नवले, शिवाजी उद्वंत, किसनशेट लहामगे, अशोक सराफ, दत्ता नवले, सुशंत गजे, हेमंत दराडे, बाळासाहेब मुळे, अमृता नळकांडे, जनार्दन आहेर, शंभू नेहे, विवेक महराज केदार, राजेंद्र महाराज नवले, भाऊसाहेब नवले आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...