आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी जागेतील अतिक्रमण भोवले:टाकळीभानच्या सरपंच व उपसरपंचासह दहा सदस्य अपात्र ;जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचा निर्णय

टाकळीभानएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या टाकळीभान ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंचासह आठ सदस्य अशा एकूण दहा सदस्यांनी सरकारी जागेत अतिक्रमण केल्याच्या दाखल विवाद अर्जावरील निर्णय देत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी देत या दहा सदस्यांना अपात्र ठरवले. या निर्णयामुळे टाकळीभानसह परिसरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.राधाकिसन वाघुले यांनी मागील वर्षी टाकळीभान ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंचासह दहा सदस्यांनी सरकारी जागेत घरे बांधून अथवा पत्रा शेड ठोकून अतिक्रमण केले आहे. ही बाब त्यांनी निवडणूक लढवताना लपवून ठेवली. त्यामुळे हे दहा सदस्य ग्रामपंचायतीचे सदस्य राहण्यास अपात्र असल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे. या आशयाचा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमचे कलम १४(१)(ज३) १६ प्रमाणे विवाद अर्ज क्र.११९/२०२१ जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला होता.

त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्यासमोर या विवाद अर्जावर सुनावणी घेण्यात आली होती. मागील काही दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांसमोरील सुनावणी पुर्ण होऊन अर्जदार वाघुले यांचा दाखल विवाद अर्ज मंजूर करण्यात आला. त्यानुसार सविता पोपट बनकर, अशोक लालचंद कचे, सुनील तुकाराम बोडखे, लता भाऊसाहेब पटारे, संतोष उर्फ कान्हा अशोक खंडागळे, अर्चना शिवाजी पवार, अर्चना यशवंत रणनवरे, कल्पना जयकर मगर, कालिंदा बाबासाहेब गायकवाड, दिपाली सचिन खंडागळे या दहा सदस्यांना अपात्र ठरवण्याचा महत्वपूर्ण निर्णय जिल्हाधिकारी भाेसले यांनी ३० आॅगस्ट रोजी दिला.

या झालेल्या आदेशाविरुद्ध नािशक विभागीय आयुक्त यांच्याकडे १५ दिवसांच्या आत अपील करण्याचा कालावधी आहे. श्रीरामपूर तालुक्यातील १७ सदस्य असणाऱ्या सर्वात मोठ्या टाकळीभान ग्रामपंचायतीच्या दहा सदस्यांच्या अपात्रतेच्या कारवाईमुळे राजकीय वर्तृळात खळबळ उडाली आहे. ३० ऑगस्टला झालेली ग्रामसभा ही या दहा सदस्यांची शेवटची ग्रामसभा झाली.जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भाेसले यांनी दाखल विवाद अर्जावरील निर्णयाच्या आदेशाविरुध्द १५ दिवसाच्या आत नाशिक विभागीय आयुक्तांकडे अपिल करणार असल्याचे उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...