आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोशल मीडियावर वादग्रस्त ऑडिओ क्लिपमुळे बुधवारी रात्री शहरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. आशा टॉकीज परिसरात व माळीवाडा येथे दोन गट जमले होते. स्थानिक गुन्हे शाखा व कोतवाली पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील वाद टळला. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत. गोपनीय शाखेचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र गर्गे यांच्या फिर्यादीवरून बारातोटी कारंजा, माळीवाडा येथे जमा झालेल्या व घोषणाबाजी करणाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. ओंकार रमेश घोलप, रोहित सोनेकर, शुभम कोमाकुल, गोट्या परदेशी, यश घोरपडे, ऋषी लगड (सर्व रा. नगर) व इतर ५० ते ६० जणांविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे. अंमलदार अभय कदम यांच्या फिर्यादीवरून तख्ती दरवाजा येथे हातामध्ये दंडुके, लोखंडी रॉड घेऊन जमलेल्या व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. साहिल गुलाम दस्तगीर, मोहसीन रफिक शेख, जमील नवाज बेग, सय्यद आवेज जाकीर ऊर्फ बोबो, सय्यद परवेज जाकीर (सर्व रा. तख्ती दरवाजा) व इतर सात ते आठ तरूण मुले यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आता पोलिस तपास करत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
फोनवरून दोघांमध्ये झाला वाद, पोलिसांचा तपास सुरू ओंकार रमेश घोलप (वय २५ रा. कोतवाली पोलिस क्वार्टर शेजारी) यांनी वादग्रस्त स्टेटस ठेवल्यामुळे त्यांना बुधवारी दुपारी सद्दाम जाकीर सय्यद (रा. मुकुंदनगर) याने फोन करून तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केले. त्यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर प्रसारीत केली. यावरून घोलप याने कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सद्दाम जाकीर सय्यद याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही गुन्ह्यांचा तपास पोलिस करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.