आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:पालकमंत्र्यांचा जिल्ह्यात दहशतवाद ; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची विखेंवर टीका

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात पालकमंत्र्याचा दहशतवाद सुरू आहे. खोट्या केसेस करण्याचा कार्यक्रम चालू आहे. सध्याचे सरकार कलंकित सरकार आहे, असा आरोप माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी केला. दरम्यान, रात्री उशिरा आमदार रोहित पवार यांनी उपोषणस्थळी भेट दिली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात उपोषणच्या पार्श्वभूमीवर आश्वासनाबाबत मजकूर तयार करण्याचे काम सुरु होते. उपोषणावर आज तोडगा निघण्याची शक्यता आहे.

आमदार निलेश लंके यांनी महामार्गांच्या दुरुस्तीसाठी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी थोरात आले होते. यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, घनश्याम शेलार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप शेळके, संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण काळे आदी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, लंके हे सर्वसामान्यांचे आमदार आहेत. कोरोना काळात त्यांनी चांगले काम केले आहे. पालक शब्द कशाला वापरायचा, उपोषणस्थळी येण्याची जबाबदारी ही राधाकृष्ण विखे यांची आहे. तिकडे राज्यपाल आणि इकडे हे पालकमंत्री आहेत. आमदार आपल्या दारात उपोषणाला बसले तरी तुम्ही पोहोचू शकत नाही याचा अर्थ काय समजायचा? आम्हीच कौतुकाने कलेक्टरला आणले. तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडायची होती. अनेक सरकार अनेक मुख्यमंत्री पाहिले. जिल्ह्यात पालकमंत्र्याचा दहशतवाद सुरू आहे. खोट्या केसेस करण्याचा कार्यक्रम चालू आहे. सध्याचे सरकार कलंकित सरकार आहे, असा आरोप थोरात यांनी केला.प्रश्न ज्वंलत आहे. नितीन गडकरी पक्ष पाहत नाही, गडकरी संवेदनशील आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर तुमचे चांगले संबंध होते. ते तुम्हाला घरच्यासारखेच वाटायचे, असा टोला त्यांनी लगावला.

सरकार निगरगट्ट : तनपुरे माझी मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले,लंके यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. लंके आणि माझ्यावर नगर -मनमाड रस्त्याबाबत आरोप झाले.केंद्राकडून या रस्त्याच्या कामाबाबत संवेदनशीलता दाखवायला होती.लंके आणि माझ्यावर नगर -मनमाड रस्त्याबाबत आरोप झाले. मोठे कंत्राट देताना ठेकेदाराची काम करण्याची क्षमता आहे का ? हे तपासणे आवश्यक असते. प्रश्नांना बगल देण्याचे काम त्यांनी केले. नगर -पाथर्डी रस्त्याची काय अवस्था झाली आहे. तिथे तुमच्या पक्षाचे आमदार आहेत. तुमच्या पक्षाच्या आमदारावरही असेच आरोप करा. उपोषणस्थळी अधिकारीही येत नाही हा असंवेदनशीलपणाचा कळस आहे. हे सरकार निगरगट्ट आहे. हे सरकार किती दिवस चालेल, आम्ही परत येणारच आहोत, असे प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

उपोषण सोडण्याची विनंती जिल्ह्यात सध्या दुर्दैवाने खालच्या पातळीचे राजकारण सुरू झाले आहे. लंके यांनी सुरू केलेले उपोषण सोडावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना या प्रश्नाबाबत आम्ही विनंती करू. विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंतराव पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेलेे या सर्वांना सोबत घेऊन या या प्रश्नावर तोडगा काढू. जिल्ह्यात सुरू असलेल्या या प्रकाराला सामुदायिक पद्धतीने विरोध केला पाहिजे, असे मत थोरात यांनी यावेळी व्यक्त केले.

तीन किलो वजन घटले गेल्या तीन दिवसापासून उपोषणाला बसलेल्या आमदार निलेश लंके यांचे शुक्रवारी वजन ३ किलोने कमी झाल्याचे क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष सतीश पालवे यांनी सांगितले. दरम्यान उपोषण स्थळी वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी प्रशासनाकडून रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे.

जिल्ह्यात सुडाचे राजकारण राज्यातील उद्योग त्यांनी जिल्ह्यात सुरू केले आहेत. महसूल खात्याचे सर्वाधिक काळ काम सांभाळले. आम्ही असे कधीच केले नाही. जिल्ह्यात सुडाचे राजकारण चालू आहे. आम्ही कुणाला जेलमध्ये घातले नाही. आता वेगळा विचार करावा लागेल, असे थोरात म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...