आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकप्रतिनिधींचा धिक्कार:मुलभूत सुविधांसाठी पाथर्डी पालिकेवर थाळीनाद मोर्चा

पाथर्डी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील आंबेडकर नगर मेहेर टेकडी परिसरातील नागरिक सुविधांअभावी याताना भोगत आहेत. पालिकेत दहा वर्षे भाजपची सत्ता असूनही अधिकारी व लोकप्रतिनिधींकडून निव्वळ टक्केवारीचा कार्यक्रम सुरू आहे. शहराच्या दुरावस्थेला आमदार जबाबदार आहेत अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्राध्यापक किसन चव्हाण यांनी करत पालिका प्रशासन लोकप्रतिनिधींचा धिक्कार केला.

आंबेडकर नगरमधील मूलभूत नागरी सुविधांसाठी पालिकेवर थाळी नाद निषेध मोर्चा निघाला, त्यावेळी ते बाेलत हाेते. आंदोलनात उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के, प्यारेलाल शेख, राजू पठाण, संगीता दिनकर, आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले. मुख्याधिकारी व बांधकाम विभागातील कर्मचारी गैरहजर राहिल्याने आंदोलकांनी घोषणा देत निषेध व्यक्त केला. चव्हाण म्हणाले, पाथर्डी पालिकेत एकहाती सत्ता असूनही मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाले आहे.

वारंवार आंदोलने करूनही सुविधा मिळत नाहीत. ठराविक नेत्यांची हुजरेगिरी करत अधिकारी मनमानी करत आहेत. सर्वत्र प्रभारी राज आहे. लोकप्रतिनिधींना कशाचीही पर्वा नाही. अधिकारी कर्मचारी कार्यालयात थांबत नाहीत, याचा आमदारांनी विचार करण्याची गरज आहे. कामात कुचराई करणारा अधिकारी व कर्मचाऱ्याला जाब विचारून कामे करण्यास भाग पाडू, असेही चव्हाण म्हणाले. कार्यालय अधीक्षक आयुब सय्यद यांनी पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले.

बातम्या आणखी आहेत...