आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:ख्रिसमसनिमित्त केलेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे मानले आभार

संगमनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ख्रिस्ती बांधवांचा ख्रिसमस अर्थात नाताळ पुढील आठवड्यात येऊ घातला आहे. या निमित्त ख्रिस्ती विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. राज्यातील सर्व चर्च, प्रार्थनागृहांना संरक्षण देण्याचे आश्वासन त्यांनी देत पोलीस आयुक्तांना सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्याच्या सूचना केल्या आहे. या सहकार्याबद्दल ख्रिस्ती विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले यांनी त्यांचे आभार मानले. नाताळ निमित्त ख्रिस्ती बांधवांची लगबग सुरु आहे.

या सणामध्ये धार्मिक विधींना अनन्यसाधारण महत्त्व असते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेच्या विश्वस्त जेनेट डिसुजा यांच्या नेतृत्वाखाली ख्रिस्ती सामाजिक संघटना व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. भेटी दरम्यान नाताळ व नववर्षाच्या मध्यरात्री चर्चमधील उपासना दरम्यान सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चा झाली. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नियोजनाची माहिती मिळावी, असे आवाहन परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले, उपाध्यक्ष अ‍ॅड. सिरील दारा, सरचिटणीस प्रफुल्ल असुरलेकर यांनी केले होते.

बातम्या आणखी आहेत...