आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:राजस्थानच्या त्या शिक्षकाला फाशीची शिक्षा व्हावी; भीमशक्ती ची माागणी

कोल्हार3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानमध्ये अमानुषपणे विद्यार्थ्याला मारहाण करून ठार मारणाऱ्या शिक्षकाला फाशी झाली पाहिजे, या मागणीचे निवेदन भीमशक्ती मित्र मंडळाच्या वतीने लोणी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांना देण्यात आले. जालोर येथील तिसरीमधील दलित विद्यार्थी इंद्रकुमार मेघवाल हा शाळेतील माठातील पाणी पिला याचा राग येऊन शाळेतील शिक्षकाने जातीय द्वेशातून अमानुषपणे मारहाण केली. त्यात त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे या शिक्षकाला शिक्षकाला फाशी झालीच पाहिजे, असे निवेदनात नमूद केले.

भीमशक्ती मित्र मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते बसस्थानकापर्यंत रॅली काढण्यात आली. बसस्थानकासमोर निषेध सभा घेण्यात आली. यावेळी प्रथम संविधानाचे वाचन करण्यात आले. यावेळी कॉम्रेड पांडुरंग शिंदे, प्रवीण लोखंडे, संतोष लोखंडे, सुरेश पानसरे, राजेंद्र बर्डे, दिलीप बोरुडे, दीपक चक्रे, सुनील बोरुडे, शाम जाधव, प्रसन्न लोखंडे, नितीन लोखंडे, नितीन ब्राम्हणे, शाम लोखंडे, वैशाली लोखंडे, शोभा लोखंडे, शशिकला लोखंडे, कविता वाघमारे, कॉम्रेड लबडे, बाबासाहेब भिंगारदिवे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...