आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे-औरंगाबाद एक्सप्रेस:जिल्ह्यातून 123 किमीचा पुणे-औरंगाबाद एक्सप्रेसवे जाणार

बंडू पवार | नगर9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे -औरंगाबाद एक्सप्रेसवे मुळे नगर महामार्गाच्या मुख्य ट्रकवर येणार असून, हा नवा एक्सप्रेसवे नगर जिल्ह्यातील नगर, नेवासे व पाथर्डी या तालुक्यांतून १२३ किलोमीटर जाणार आहे. “एक्सप्रेस’वे च्या भूसंपादनासाठी नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले अाहे. पुढच्या पंधरा दिवसांत लोकप्रतिनिधींची बैठक घेतली होणार आहे.

पुणे -नगर -औरंगाबाद असा नवा एक्सप्रेसवे तयार होणार अाहे. २६० किलोमीटरचा हा नवा एक्सप्रेस राहणार आहे. यात नगर जिल्ह्यात १२३ किलोमीटरचा हा एक्सप्रेसवे राहणार आहे. नगर जिल्ह्यातील नेवासे, नगर, पाथर्डी या तीन तालुक्यांचा समावेश राहील. नगर -औरंगाबाद या सध्याच्या रस्त्यापासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरुन हा नवा एक्सप्रेस वे जाणार आहे.

पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर येथून या एक्सप्रेसवेला सुरुवात होणार आहे. या एक्सप्रेसवेसाठी पुणे जिल्ह्यातील भूसंपादनासाठी भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली अाहे. लोकप्रतिनिधींची बैठक देखील झाली आहे. जिल्ह्यातील एक्सप्रेसवेसाठी भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही. दरम्यान, औरंगाबाद- पुणे या नवीन एक्सप्रेसवेसाठी लोकप्रतिनिधींची बैठक बोलावू, असे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

जुन्या पुणे -औरंगाबाद रोडवरील वाहतूक होणार कमी
पुणे -औरंगाबाद हा सध्याचा रस्ता सध्या बांधकाम विभागाच्या अखेरित्या येतो. या रस्त्यावरून पुणे व औरंगाबादकडे जाणारी व येणारी वाहतूक नगर शहरामार्गे जाते. नव्या एक्सप्रेसवेमुळे ही वाहतूक शहरातून जाण्याऐवजी नगर शहराबाहेरून होत असलेल्या नव्या एक्सप्रेसवे ने जाणार आहे. त्यामुळे भविष्यातील शहरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.

लवकरच लोकप्रतिनिंधी बरोबर बैठक
नगर जिल्ह्यातील भूसंपादनाबाबत चर्चा करण्यासाठी लोकप्रतिनिधींची बैठक बोलावण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने पत्र दिले आहे. पुढच्या पंधरा दिवसात लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन पुढची प्रक्रिया सुरू होणार आहे.''मिलिंद वाबळे, वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण.