आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवळल्या:दरोड्यातील 5 आरोपींच्या मुसक्या आवळल्या ; शेवगाव ठाण्यात गुन्हा दाखल होता

शेवगाव शहर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पायी जात असलेल्या फिर्यादीला मारहाण करत हातातील आयपॅड असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न रविवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या दरम्यान घडला होता. मात्र आरडा-ओरड केल्याने दरोडेखोर त्या ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी झाले होते. याप्रकरणी शेवगाव ठाण्यात गुन्हा दाखल होता. शेवगाव पोलिसांनी शनिवारीपाच जणांच्या मुसक्या आवळल्या. पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी तपासाची चक्रे जलद फिरवली. यात सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी शेवगाव पोलिसांनी इरफान शेख, जहीर शेख, सोमनाथ गवते, अरबाज शहाबुद्दीन शेख (सर्व रा.शेवगाव) व अन्य एक अशा पाच जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके, रवींद्र बागुल, अंमलदार बडदे,महेश सावंत पोलीस कॉन्स्टेबल नाकाडे, बागुल सुखदेव धोत्रे सोमनाथ घुगे, गुप्तवार्ता विभागाचे बप्पासाहेब धाकतोडे, रवींद्र शेळके, वासुदेव डमाळे, संतोष काकडे यांच्या पथकाने केली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक आशिष शेळके करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...