आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इम्पॅक्ट:महसूलमंत्री सरसावले; 500 खाटांचे कोविड सेंटर उद्यापासून होणार सुरू

शिर्डी9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कुंभकर्णी निद्रेतील सहकारमहर्षी खडबडून जागे!

राज्यात कोरोना कहर सुरू असताना सहकारी संस्थांचे दिग्गज मात्र चार हात लांबच होते. ‘दिव्य मराठी’त हे वृत्त प्रसिद्ध होताच सहकारमहर्षी खडबडून जागे झाले. शरद पवारांनी सहकारी संस्थांनी कोविड सेंटर सुरू करण्याचे आवाहन केले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी तर संगमनेर येथे पाचशे बेडचे कोविड सेंटर साखर कारखान्याच्या माध्यमातून तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेतला.

‘राज्यात कोरोनाने शेकडो मृत्यू; सहकारसम्राट कुंभकर्णी निद्रेत’ अशी बातमी ‘दिव्य मराठी’त प्रसिद्ध झाल्यानंतर ही पळापळ सुरू झाली. कोरोना संकटात सहकारी उद्योगातील धुरंधर काहीच करायला तयार नव्हते. साखर कारखाने, दूध व शिक्षण संस्था, सहकारी बँका यांनी परिसरातील लोकांसाठी मदतीसाठी सरकारच्या बरोबरीने सहभाग घेतला नसल्याने ग्रामीण लोकांत प्रचंड रोष आहे. नाशिक येथे रविवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने सुरू केलेल्या कोविड सेंटरच्या व्हर्च्युअल उद्घाटन कार्यक्रमावेळी बोलताना शरद पवार यांनीही बातमीची दखल घेऊन या क्षेत्रातील लोकांचे कान टोचले होते.

सहकारी संस्थांनी पुढे येण्याची गरज
कोरोनाला आवर घालण्यासाठी लॉकडाऊन पाळलाच पाहिजे.कोरोना रुग्णांना चांगल्या सुविधा देण्यासाठी सहकारी संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने आजवरच्या सर्व आपत्ती काळात मोठे योगदान दिलेले आहे. कोरोना संकटातही ५०० बेडच्या कोविड सेंटरची उभारणी संगमनेर येथे युद्धपातळीवर सुरू आहे. -बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

बातम्या आणखी आहेत...