आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:तलवार दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

संगमनेर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर-शिर्डीत तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणारा सलीम अकबर पठाण (वय २१, श्रीरामनगर, शिर्डी-राहाता) उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने गुरुवारी सापळा रचून पाठलाग करत त्याच्या मुसक्या आवळल्या. तो शहरातील कोल्हेवाडी रोड येथील पत्र्याच्या गोडावूनमध्ये लपलेला होता.

सलीम व हालिम अकबर पठाण या दोघा भावांनी शिर्डी व संगमनेरमध्ये तलवारीचा धाक दाखवून दहशत निर्माण केली होती. मार्च २०२१ मध्ये या दोघांना पकडण्यास गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला असाच धाक दाखवून धक्काबुक्की करून पळ काढला होता. या गुन्ह्यात पोलीस सलीम पठाणच्या मागावर होते. हलीम पठाण याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. मात्र सलीम पठाण पोलिसांना १ वर्षापाससून चकवा देत होता. तो कोल्हेवाडी रोड येथील पत्र्याच्या गोडावूनमध्ये असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक राहुल मदने यांना मिळताच पोलिस नाईक अण्णासाहेब दातीर, कॉन्स्टेबल अमृत आढाव, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, गणेश शिंदे, फुरकान शेख (सायबर सेल, श्रीरामपुर) या पथकाला कारवाईचे आदेश दिले. गुरुवारी पथकाने गोडाऊन जवळ सापळा रचून त्याला अटक केली.

त्याच्यावर पोलिसात जवळपास ९ गंभीर गुन्हे दाखल आहे. सलीम पठाणने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तपासाअंती आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्याला आज शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...