आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुद्देमालासह अटक:वेषांतर करून तीन वर्षांपासून फरार आरोपीला पोलिसांनी ठाेकल्या बेड्या

श्रीगोंदे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील शेडगाव परिसरात काही गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या लोकांच्या वस्त्यांवर श्रीगोंदे पोलिसांच्या पथकाने छापा टाकला असता सुमारे तीन वर्षांपासून विविध गुन्ह्यात फरारी असलेला आरोपी दीपक सुरेश गायकवाड वय २६, रा. भिंगान याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून सुमारे ९ हजार रुपये रोख, ८ मोटारसायकल असा एकूण २ लाख ६९ हजार रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली.

श्रीगोंदे तालुक्यातील भिंगान खालसा येथील दीपक गायकवाड याच्यावर तालुक्यातील चोरी, घरफोडी, जबरी चोरी, डीपी चोरी, दरोडा, मोटारसायकल चोरी असे विविध गुन्हे श्रीगोंदे पोलिस ठाण्यात दाखल आहेत. तो सुमारे तीन वर्षांपासून वेषांतर करून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़िरत होता. दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील शेडगाव येथे श्रीगोंदे पोलिसांनी काेम्बिग ऑपरेशन करत असताना आरोपी दीपक गायकवाड हा संशयित रित्या फिरत असल्याचे आढळून आल्यानंतर श्रीगोंदे पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी केली असता ९ हजार रुपये रोख, बनावट नंबर टाकून विकलेल्या गाड्या असा मिळून सुमारे २ लाख ६९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समीर अभंग, सुनील सुर्यवंशी, प्रदीप बोऱ्हाडे, गोकुळ इंगवले, प्रकाश मांडगे, किरण बोराडे, दादासाहेब टाके, अमोल कोतकर, रविंद्र जाधव यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...