आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • The Administration Seized 11 Kg Of Silver Coins From The 18th To 19th Centuries; Secret Treasure Found While Excavating A House In Belapur; News And Live Updates

श्रीरामपूर:18 ते 19 व्या शतकातील 11 किलो चांदीची नाणी प्रशासनाने घेतली ताब्यात; बेलापुरात घराचे खोदकाम करताना सापडले गुप्तधन

श्रीरामपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बेलापूर येथे खोदकामात सापडलेल्या नाण्यांची मोजदाद करताना प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी.

नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी हरिनारायण खटोड यांच्या घराचे खोदकाम करताना गुप्तधन सापडले. यात ११ किलो चांदीची नाणी सापडली असून घरमालकाने प्रशासनाला माहिती दिल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार तहसीलदार प्रशांत पाटील यांनी पंचनामा करत या गुप्तधनाचा ताबा घेतला.

खटोड यांच्या घराच्या आवारासाठी खोदकाम सुरू असताना मंगळवारी सकाळी चांदीची नाणी असलेले हंडे सापडल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर खटोड यांनीच याबद्दल जिल्हा प्रशासनाला माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार तहसीलदार प्रशांत पाटील, फौजदार समाधान सुरवाडे, मंडळाधिकारी बाबासाहेब गोसावी, उपकोषागार विभागाचे राहिंज, कामगार तलाठी कैलास खाडे आदींनी पंचनामा करून नाणी ताब्यात घेतली.

चांदीच्या काही नाण्यांवर राणी व्हिक्टोरियाचे चित्र
पंचनाम्यात चांदीच्या नाण्यांचे वर्णन केले असून ती सन १८०० ते १९०० या कालावधीमधील व राणी व्हिक्टोरियाचे चित्र असलेली आहेत. यामध्ये ४६ नग ४ आणे पावली, ५८ नग ८ आणे पावली, ९१४ नग १ रुपयांची नाणी, उर्दू भाषा असलेली २ नाणी अशी एकूण एक हजार २० नाणी सापडली आहेत. त्यांचे वजन ११.०६ किलोग्रॅम असून त्यांचे बाजारमूल्य सात लाख ७९ हजार २२४ रुपये आहे.

बातम्या आणखी आहेत...