आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्त्या:मनपातील अभियंत्यांच्या नियुक्त्या रखडल्या

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेमध्ये विविध विभागात मानधनावर १७ अभियंत्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी ५४१ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी २८७ जणांनीच मुलाखतीला हजेरी लावली होती. मात्र, मुलाखती होण्यापूर्वीच उमेदवारांच्या नावांची शिफारस असलेल्या याद्या आयुक्तांकडे सादर झाल्याने या मुलाखतींचा निकाल महिनाभरानंतरही रखडलेलाच आहे.

अभियंत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने सध्या महापालिकेकडून पाणीपुरवठा, बांधकाम, नगर रचना व विद्युत विभागात मानधनावर १७ अभियंते नियुक्त केले जाणार आहेत. त्यासाठी मागील महिन्यात मुलाखतींची प्रक्रिया पार पडली. विद्युत विभागात विद्युत पर्यवेक्षक या एका पदासाठी १२ जणांनी अर्ज केले होते. ५ जणांनी या जागेसाठी मुलाखती दिल्या आहेत. बांधकाम विभागात ७ अभियंत्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी सर्वाधिक ३४५ अर्ज आले होते. त्यापैकी १८६ जणांनी मुलाखत दिली आहे.

नगररचना विभागात ४ जागांसाठी ८९ अर्ज आले होते. त्यापैकी ५८ जणांनी मुलाखत दिली आहे. पाणीपुरवठा विभागात ५ जागांसाठी ९५ अर्ज आले होते. त्यापैकी ३८ मुलाखती झाल्या आहेत. एकूण २८७ उमेदवारांच्या मुलाखती झाल्या आहेत. महिनाभरानंतरही या मुलाखतींचा निकाल व नियुक्त्या रखडल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...