आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:पंचायत समितीच्या सहायक आयुक्ताला 80 हजारांत गंडवले

संगमनेर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले येथील पशु संवर्धन विभागाचे सहायक आयुक्त जालिंदर काशिनाथ थिटमे यांना अनिडेस्कच्या माध्यमातून ८० हजाराला गंडा घातला आहे. राजकुमार एसबीआय (मिरारोड, मुंबई) असे आरोपीचे नाव असून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आयुक्त जालिंदर थिटमे घरी असताना राजकुमार एसबीआय याचा मोबाईलवर फोन आला.

त्याने मोबाईलवर अनिडेस्क अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. अ‍ॅप लोड होताच ओटीपी आल्याने थिटमे यांना सांगण्यास सांगितला. ओटीपी सांगताच काही सेकंदात थिटमे यांचे ८० हजार रुपये खात्यातून कमी झाले. बँकेकडून मोबाईलवर मॅसेज आला असता आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी शहर पोलिस ठाणे गाठले.

बातम्या आणखी आहेत...