आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठिय्या आंदोलन:राष्ट्रवादी कामगार सेलचे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात ठिय्या

नगर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयातील बांधकाम मजुरांना साहित्य किट मिळत नसल्याच्या निषेधार्थ बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जिल्हा कामगार सुविधा केंद्राचे कार्यालय असून या कार्यालयामध्ये जिल्हाभरातून बांधकाम कामगार मोठ्या संख्येने आपल्या विविध कल्याणकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी येतात.

या कार्यालयातून लाभार्थींना कार्ड व बांधकाम साहित्य किट देण्यात येते. परंतु कार्यालयामध्ये कार्ड व बांधकाम साहित्य किट उपलब्ध नसल्याने तेथे जिल्हाभरातून बांधकाम कामगारांना चकरा माराव्या लागत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कामगार सेलचे जिल्हा अध्यक्ष गजानन भांडवलकर यांच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे निलेश बांगरे, आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...