आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या दुचाकी पेटवल्या

नगर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरासमोर रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या दोन दुचाकी अज्ञात व्यक्तीने ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्या. रविवारी रात्री पावणे बारा वाजेच्या दरम्यान शनिमंदिराशेजारी टांगे गल्ली येथे ही घटना घडली.

या प्रकरणी सुनील अशोक एडके (वय ३४) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीने रविवारी रात्री त्यांची दुचाकी (एमएच १६ सीडब्ल्यू ६०१३) व शेजारी त्यांची बहिण अनिता भाऊसाहेब तेलोरे यांची दुचाकी (एमएच ४५ एजे ६७५) उभी केली होती. रात्री पावणे बारा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने दुचाकी पेटवून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...