आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:सीना नदीवरील पुलाची तत्काळ दुरुस्ती करावी

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावेडी ते बोल्हेगाव रस्त्यावरील सीना नदीवरील पुलाची दुरवस्था झाली असून, या पुलाचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी मागणी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी उपायुक्त श्रीनिवास कुरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दुरूस्तीचे काम तात्काळ सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी अक्षय वाटमोडे, अभिषेक वाकळे, रोहित वाकळे, प्रतीक वाकळे, दत्ता रकटे, दीपक राजापुरे, शंकर वाटमोडे, आदित्य खरात, कान्हा मेने, प्रसाद वाटमोडे, अविनाश वाटमोडे, वैभव वाटमोडे आदी उपस्थित होते. सावेडी ते बोल्हेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूक आहे. परिसरातील शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचीही या रस्त्यावरुन सतत वर्दळ सुरु असते. रस्त्याची व पुलाची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी नागरीकांकडून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...