आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:शिक्षकांच्या मार्गदर्शनाने घडते विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य; वाळकी येथील शिक्षक भालसिंग यांचे प्रतिपादन

नगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडविणार्‍या वाळकी येथील शिक्षक सचिन भालसिंग यांचा शिक्षक दिनानिमित्त जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. मानवाधिकारचे नगर तालुकाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी त्यांचा सन्मान केला.

सचिन भालसिंग वाळकी या गावात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खासगी क्लासच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे देत आहेत. अनेक गरीब व गरजू घटकातील विद्यार्थ्यांकडून फी न घेता त्यांचे भवितव्य घडवले असून, त्यांचे अनेक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत.सचिन भालसिंग यांनी स्वत: गरिबीतून शिक्षण घेऊन पुढे आलो असल्याने याची जाणीव ठेऊन गरजू घटकातील विद्यार्थ्यांना आधार देत आहेत. या सन्मानामुळे शिक्षण क्षेत्रात आणखी चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळणार असल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...