आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोळंबा:कालवा झाला स्वच्छ; पण चाऱ्या हरवल्या झाडीझुडपात

श्रीरामपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरीप हंगाम संपून रब्बी हंगाम सुरू झाला आहे. तरीही अद्याप पाटबंधारे विभागाचे भंडारदरा धरणातुन शेतीला खरीप आणि उन्हाळी किती आवर्तने देणार हे जाहीर केले नाही. दुसरीकडे आवर्तन सुरू होण्यापूर्वी पाटपाणी चाऱ्यांची स्वच्छता व दुरुस्तीही केली नसल्याने चाऱ्या झाडे झुडपांमध्ये हरवून गेल्याचे चित्र दिसत आहे.

अद्याप कालवा सल्लागार समितीची बैठक झाली नसल्याने रब्बीची व उन्हाळी पिकासाठी किती आवर्तने सोडली जाणार हे निश्चित झालेले नाही. गहू व हरबरा पेरणी सुरू आहे तर काही ठिकाणी पेरणी झालेली आहे. यावर्षी पाऊस भरपूर झाल्याने पाणी पातळी वाढलेली आहे. त्यामुळे विहिरी व बोअरवेलला चांगले पाणी आहे. मात्र पूर्ण दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने पाणी उपश्याच्या समस्याही कायम आहेत. तर काहींची शेती केवळ पाटपाण्यावर आहे. त्यामुळे शेतीला किती आवर्तने दिली जाणार हे निश्चित झाले तर शेतकऱ्यांना पिकांचे नियोजन करणे सोपे जाणार आहे.

पाटबंधारे विभागाने मुख्य कालव्यातील गाळ काढून स्वच्छता केलेली आहे. दरवर्षी आवर्तने सोडण्यापूर्वी पाण्याला अडथळा ठरणाऱ्या चाऱ्यामधील गवत व उगवलेली झाडे झुडपे काढून चाऱ्या स्वच्छ केल्या जातात. मात्र गेल्या काही वर्षांपासून हे काम होत नाही. त्यामुळे चाऱ्या गवतात व झुडपांमध्ये हरवून गेलेल्या आहेत. आता जर आवर्तन सोडले तर पाणी जायला अडथळा निर्माण होणार आहे. तर काही ठिकाणी उंदरांनी बिळे केल्यामुळे पाणी वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चाऱ्यांची दुरुस्ती व स्वच्छता करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...