आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर तालुक्यातील रुईछत्तीशी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केलेल्या १९ वर्षीय महिलेचा ३१ जानेवारीला प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला. तिच्यावर उपचार करणाऱ्या खासगी डॉक्टराकडे सनद नसल्याने, तो बोगस असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात बोगस डॉक्टरावर नियंत्रण ठेवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जनाधार संघटनेचे प्रकाश पोटे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांच्याकडे केली आहे. पोटे म्हणाले, की शंकर फुलमाळी यांच्या १९ वर्षीय मुलीला प्रसुतीसाठी डी. बी. बोस या खासगी रुग्णालयात दाखल केले होते.
मात्र, उपचारादरम्यान मुलीसह पोटातील बाळाचा मृत्यू झाला. चुकीच्या पद्धतीने केलेल्या उपचारामुळे माय-लेकाचा मृत्यू झाला. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत संबंधित डॉक्टर ज्ञानेश्वर निवृत्ती पवार याची चौकशी केल्यानंतर त्याच्याकडे वैद्यकीय सनद नसल्याचे समोर आले. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित डॉक्टराबरोबरच या बोगस डॉक्टरवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाही तितकीच जबाबदार आहे. याप्रकरणी संबंधितावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आम्ही जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांच्याकडे केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.