आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साफसफाई:आधुनिक यंत्रांद्वारे होणार चेंबरची साफसफाई ; वाढत्या मृत्यूच्या प्रमाणमुळे केंद्र शासनाचा निर्णय

नगर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेंबरमध्ये उतरून काम करताना सफाई कर्मचाऱ्यांच्या वाढत्या मृत्यूचे प्रमाण लक्षात घेऊन केंद्र शासनाने सफाई मित्र सुरक्षा अभियान हाती घेतले आहे. या अंतर्गत चेंबरमध्ये न उतरता अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने सफाईसाठी सफाई सुरक्षा चॅलेंज अंतर्गत कार्यक्रम राबवला जात आहे. याअंतर्गत मशिनरी खरेदीसाठी महापालिकेने प्रस्ताव केला आहे. नॅशनल सफाई कर्मचारी फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या स्वच्छता उद्योग योजनेमधून महापालिका अर्थसहाय्य घेणार आहे. त्यासाठी अंदाजे १ कोटी ८९ लाख ३० हजार खर्च अपेक्षित आहे. मनपाने चालू वर्षात घनकचरा व्यवस्थापन मशिनरी व उपकरणे खरेदीसाठी ६५ लाख तरतूद केलेली आहे. सर्वसाधारण सभेकडे यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे उपायुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.

या मशिनरींची खरेदी प्रस्तावित{ एअरलाइन ब्रीदींग अपार्टस { गॅस मॉनिटर{ सिवर इन्स्पेक्शन कॅमेरा{ पॉवर रॉडींग अपार्टस{ हायड्रो व्हॅक सेट{ व्हेइकल

बातम्या आणखी आहेत...