आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रेम, दया, शांतीचा संदेश देणाऱ्या ख्रिस्ती समाजाचे सर्वच क्षेत्रात मोठे योगदान आहे. मिशनऱ्यांनी जे रोप लावले त्याचे वृक्षात रूपांतरही झाले. मात्र सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय प्रवाहामध्ये आजही ख्रिस्ती समाज नगण्य असल्याची खंत महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भोसले यांनी व्यक्त केली.
भोसले म्हणाले, ख्रिस्ती समाज राजकीय व सामाजिक क्षेत्रात प्रामाणिकपणे उभा राहिला आहे. मात्र समाज भावनांचा आदर होताना दिसत नाही. ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत ख्रिस्ती समाजाचे प्रतिनिधी शोधूनही सापडत नाही. समाजाला आता विचार करण्याची वेळ आली आहे. समाजाचे अनेकविध प्रश्न प्रलंबित आहेत. अल्पसंख्याक आयोग, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ व राजकारणात समजला स्थान दिले जात नाही. नोकऱ्या, उच्च शिक्षणामध्ये आरक्षणाचा अभाव आहे. दिवसेंदिवस होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत असून न्याय मिळताना दिसत नाही.
गाव पातळीवरील रेशनिंग व तंटामुक्ती कमिटीमध्ये समाजाला समविष्ट करून शासकीय योजनांचा लाभ मिळावा. यासाठी अध्यक्ष अनिल भोसले यांच्या नेतृत्वाखाली ख्रिस्ती समाजाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन समाजाच्या ज्वलंत प्रश्नावर लक्ष वेधून आग्रही मागणी करणार आहे. समाजाच्या न्याय हक्कासाठी मोठे जनआंदोलन उभे करणार असल्याचे भोसले यांनी सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.