आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरकरांसाठी डोकेदुखी:नगर झाले धुळीचं शहर ; बहुतांश भागात रस्ते उखडल्याने धुळीचे साम्राज्य

नगर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर एक खेडे असल्याची ओळख उड्डाणपुलामुळे पुसली जात असताना नगर आता धुळीचे शहर झाले आहे. नगर शहरांतर्गत असलेल्या सर्व रस्त्यावर पावसामुळे खड्डे पडल्याने व दुरुस्ती केल्यानंतर रस्त्यांवर खडी टाकल्यामुळे नगरकरांना खड्ड्यांबरोबरच धुळीने नकोसे केले आहे.

गेल्या ऑक्टोबर महिन्यात नगर शहर व परिसरात झालेल्या पावसामुळे बहुतांशी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यातून वाहने चालवताना नगरकरांचा जीव मेटाकोटीस आला असताना धुळीने नगरकरांना हैराण केले आहे. शहरातील कापड बाजार, दिल्ली गेटसह अन्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यातून वाहने काढताना नगरकरांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. एकीकडे खड्डे तर दुसरीकडे धूळ यामुळे नगरकर पुरते त्रस्त झाले आहेत. शहरात धुळीमुळे अनेक जण नाकाला रुमाल लावून दुचाकी वाहने चालवताना दिसत आहेत. विशेष म्हणजे धुळी मुळे काही अंशी संसर्गजन्य आजारात देखील वाढ झाल्याचे दिसते. एकीकडे प्रशासन खड्डे बुजवत असताना दुसरीकडे डांबरीकरण केल्यानंतर टाकलेल्या खडीमुळे धूळ उडताना दिसत आहे. ही धूळ नगरकरांसाठी डोकेदुखीची ठरली आहे.

बातम्या आणखी आहेत...