आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:ऋषितुल्य व्यक्तींच्या कर्तृत्वाने नगरला ओळख व आदर प्राप्त ; मनोज पाटील यांचे प्रतिपादन

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ऋषितुल्य व्यक्तींचा सन्मानाचा हा कार्यक्रम सकारात्मक असल्यानेच या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. आदर्शवत असलेल्या ऋषितुल्य व्यक्तींचा सन्मान करण्याचे भाग्य मला रसिक ग्रुपमुळे मिळाले, त्यांचा सन्मान करताना मी स्वतः सन्मानित होत होतो. हृदयस्पर्शी झालेला या कार्यक्रमामुळे मन भरून आलय. सर्व सत्कारार्थींच्या विविध क्षेत्रातील उतुंग कामगारीने नगर शहराला समृद्ध केले आहे. त्यांच्या आयुष्यभराच्या कर्तृत्वाने नगर शहराला वेगळी ओळख व आदर प्राप्त झाला आहे, असे प्रतिपादन पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी केले.

अहमदनगर सांस्कृतिक चळवळीत योगदान देणाऱ्या रसिक ग्रुपच्या वतीने ऋषिपंचमी निमित्त नगर शहराच्या जडणघडणीत व प्रगतीत बहुमोल योगदान देणाऱ्या १२ ऋषितुल्य व्यक्तींना पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते मानपत्र देऊन विशेष सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी आमदार संग्राम जगताप होते. यावेळी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, उद्दोजक प्रेमराज बोथरा, आय. एम. खान, निळकंठ देशमुख, घनश्याम शेलार, शब्दगंध साहित्यीक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, उद्दोजक सुनील मुनोत, रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर आदी उपस्थित होते.

या सन्मान सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद मिरीकर, ज्येष्ठ चित्रकार वसंत विटणकर, साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त प्रा.डॉ.मुहंमद आझम, गजराज फॅक्टरीचे संचालक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश चव्हाण, ज्येष्ठ साहित्यिका मेधा काळे, ज्येष्ठ प्राध्यापक श्रीकांत बेडेकर, ज्येष्ठ नेते किसनराव लोटके, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.अनिल सहस्त्रबुध्दे, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, मर्चंट बँकेचे ज्येष्ठ संचालक हस्तीमल मुनोत, सामाजिक कार्यकर्ते शशीकांत मुथा, ज्येष्ठ प्राध्यापक मधुसूदन मुळे व रणजीपटू बाबा चांदोरकर आदींचा शाल, पुष्पहार, ग्रंथ, मोरपीस व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

पाटील म्हणाले, या कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिक ग्रुपने सर्व सत्कारार्थीं प्रती आदर व्यक्त करून त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न येथे केला आहे. रसिक ग्रुपच्या या चांगल्या कार्यक्रमामुळे नवी पिढी व आम्ही या व्यक्तींचा आदर्श घेऊ.प्रास्ताविकात संयोजक जयंत येलुलकर म्हणाले, या शहराच्या प्रगतीत व सांकृतिक, शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक, साहित्यिक, आर्थिक अशा सर्व क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या व्यक्ती आपल्या नगर शहराचे भूषण आहेत. असे त्यांनी सांगितले.प्रारंभी राधिका वराडे व इशा वराडे यांनी सर्वांचे औक्षण करून मोत्यांच्या माळा घालून स्वागत करण्यात आले.गायक पवन नाईक यांच्या ईशस्तवनाने कार्यक्रमास सुरवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रसाद बेडेकर यांनी केले. गणेश भगत यांनी मानपत्रांचे वाचन केले. सुदर्शन कुलकर्णी यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...