आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँक्रीटीकरण सुरू:नगर शहरातील प्रत्येक भागात‎ मॉडेल रस्ते निर्माण करणार‎

नगर‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागरिकांना सर्व मुलभुत सुविधा‎ मिळाव्यात त्यांचे प्रश्न सुटावेत, यासाठी‎ विविध स्तरावर प्रयत्न सुरु आहेत.‎ प्रभागातील नगरसेवकांच्या पाठपुराव्यामुळे‎ या भागातील विकास कामांना चालना‎ मिळाली आहे. प्रत्येक भागात कामे करुन‎ मॉडेल रस्ते निर्माण करण्याचा प्रयत्न‎ शहरात सुरु आहे. चांगल्या कामांतून‎ शहराची एक विकसित शहर म्हणून‎ ओळख निर्माण होईल. यापुढेही अशीच‎ कामे सुरु राहतील, असे प्रतिपादन महापौर‎ रोहिणी शेंडगे यांनी केले.‎ महापौर शेंडगे यांच्या निधीतून व‎ महिला बाल कल्याण सभापती पुष्पा‎ बोरुडे, नगरसेवक सचिन शिंदे, शाम‎ नळकांडे यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्र. ८‎ मधील आदर्शनगर येथील अंतर्गत‎ रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ‎ महापौर शेंडगे यांच्या हस्ते झाला.

याप्रसंगी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ स्थायी समिती सभापती गणेश कवडे,‎ शहरप्रमुख संभाजी कदम, माजी‎ विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, माजी‎ उपमहापौर अनिल बोरुडे, अ‍ॅड. सतीश‎ गिते, पारुनाथ ढोकळे, जयराम मगर,‎ बाळासाहेब रोहकले, दत्तात्रय मते,‎ अमोल भालसिंग, एल. बी. म्हस्के,‎ विजय सोनवणे, हरिभाऊ कार्ले, अभय‎ दातरंगे, रामचंद्र बोकडे, संजय सोडकर,‎ सुमन देशमाने, खासेराव शितोळे,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कानिफनाथ शिंदे, सुभाष बर्वे आदी‎ उपस्थित होते.‎ नगरसेवक सचिन शिंदे म्हणाले,‎ प्रभागातील प्रत्येक कॉलनी, अपार्टमेंट,‎ वसाहतींना पाणी, रस्ते, ड्रेनेज, स्ट्रीट‎ लाईट अशा मुलभुत सुविधा देण्यावर‎ भर दिला आहे.

अनेक ठिकाणची कामे‎ मार्गी लागली आहेत. आणखी काही‎ प्रलंबित कामे पुढे पूर्ण होतील. आज‎ शुभारंभ होत असलेल्या रस्ता‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ काँक्रीटीकरणामुळे या भागातील‎ नागरिकांची मोठी सोय होणार आहे.‎ नगरसेवक शाम नळकांडे म्हणाले,‎ सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने प्रभागातील‎ विकास कामे मार्गी लागत आहेत.‎ याप्रसंगी स्थायी समिती सभापती गणेश‎ कवडे, शहरप्रमुख संभाजी कदम‎ यांनीही विकास कामांसाठी आपले‎ सहकार्य असेल, असे सांगितले.‎

प्रत्येक भागाचा‎ विकास करण्यावर भर‎
या प्रभागाच्या प्रतिनिधी महापौर व मी‎ महिला बालकल्याण समितीची सभापती‎ असल्याने या भागातील नागरिकांचे प्रश्न‎ सोडवून नागरिकांना सर्व सुविधा देण्यास‎ आम्ही कटीबद्ध आहोत. प्रत्येक भागाचा‎ विकास करण्यावर आमचा भर‎ असल्याचे सभापती पुष्पा बोरुडे यांनी‎ सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...